उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतुक शाखेतर्फे वाहनांना लावले रिफ्लेक्टर व बॅनर्स


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्ह्यात  ३० वे रस्ता सुरक्षा अभियान ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी  या कालावधीत  राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, व पोलीस विभाग , वाहतुक शाखा , गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, व पोलीस विभाग , वाहतुक शाखा , यांचे संयुक्त विद्यमाने वाहनांना रिफ्लेक्टर, बॅनर्स लावण्यात आले. कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथिल मोटार वाहन निरिक्षक, एस.एन. उचगांवकर, मोटार वाहन निरीक्षक, व्ही. यु. राठोड, व्ही.व्ही. अहेर  तसेच पोलीस विभाग वाहतुक शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी तांबुसकर यांनी परिश्रम घेतले.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-02-06






Related Photos