महत्वाच्या बातम्या

 वडील वारल्यानंतर जबाबदारी पडली पण शिक्षण सोडले नाही : अनिकेत कोरोटे कोरची तालुक्यात प्रथम 


- आई व प्राध्यापकांनी शिक्षणासाठी केली मदत
-  बारावी परीक्षेत कला शाखेतून मिळवले ८०.८३ टक्के 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : काळाने झडप घेऊन वडिलांना स्वतःपासून एका वर्षापूर्वीच हिरावून घेतले. घरातील जबाबदारी पडली पण आईने व प्राध्यापकांनी हिम्मत देत शिक्षणामध्ये मदत केली. सातत्याने शिक्षण सुरू ठेवून अनिकेत गजानन कोरोटे यांनी बेडगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्रा. शाळा तथा ज्युनिअर विघालायतून बारावी परीक्षेत कला शाखेतून ८०.८३ टक्के मिळवून कोरची तालुक्यातून प्रथम क्रमांकावर आला आहे. त्याला पुढे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन कुठलीही शासकीय नोकरी मिळवून आपल्या आईची व घराची जबाबदारी सांभाळायची आहे.
अनिकेतला दहाव्या वर्गात ८४ टक्के मिळाले बारावीतही त्याला त्यापेक्षा जास्त टक्के मिळावे याची अपेक्षा होती. परंतु अकरावीत असताना वडिलाची शेतीच्या कामामध्ये असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले. परिस्थिती हलाखीची होती तेव्हा शिक्षणामध्ये शिकण्याची इच्छा मेली होती. आई जसवंदाबाई पुढे शिक्षणासाठी आग्रही होती. रोजी मजुरी करून शिक्षणासाठी लागणारा खर्च आईने उचलला तर विद्यालयातील प्राध्यापक गणेश सोनकलंकी सरांनी पुस्तक घेऊन दिले तर इतर शिक्षणाबाबद सातत्याने मार्गदर्शन केला. त्यामुळे मी रोज सहा तास अभ्यास करायला लागलो व बारावी परीक्षा उत्तीर्ण केलं असे मत अनीकेतनी व्यक्त केले.
अनिकेतला सर्व विषयांपैकी इंग्लिश विषय हा कठीण वाटायचा परंतु विघालयातील प्राध्यापकांनी वेळोवेळी सराव घेत मार्गदर्शन केला, त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि आज इंग्लिश विषयामध्ये मला ६९ मार्क मिळाले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला व विद्यालयातील प्राध्यापकांना दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos