राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत सेक्युलर आणि सर्वसमावेशक संघटना : सी. एच. विद्यासागर राव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत सेक्युलर आणि सर्वसमावेशक संघटना आहे, असे कौतुक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केले. 
रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचे लोकार्पण मंगळवारी झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून राज्यपाल बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी जे बीज रोवले होते त्याचे स्वरूप आज विशाल वटवृक्षाप्रमाणे झाले आहे. ते जगभर विस्तारले आहे, असे राज्यपाल म्हणाले. संघाची वाटचाल जेवढी नेत्रोद्दीपक, तेवढीच खडतर अशी आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर आलेली बंदी हा संघाच्या वाटचालीतील सर्वांत खडतर टप्पा होता, अशी पुस्ती त्यांनी जोडली. विरोधक काहीही म्हणत असले तरी प्रत्यक्षात संघ ही कमालीची धर्मनिरपेक्ष व समावेशक संघटना आहे. प्रत्येकाला त्याच्या मताप्रमाणे धर्माचरणाचा, श्रद्धाचरणाचा अधिकार आहे, असे संघ मानतो, असे ते म्हणाले. संस्कृतमध्ये विविध शास्त्रांचा उगम आहे. योग, आयुर्वेद आणि संस्कृत यांना जागतिक स्तरावर मागणी आहे. यासंदर्भात अधिक काम झाल्यास भारत विश्वगुरू म्हणून गौरवास पात्र ठरेल, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. 



  Print






News - Nagpur | Posted : 2019-02-06






Related Photos