महत्वाच्या बातम्या

 आता थेट सन्मानधारकांच्या खात्यात मानधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आणीबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींना शासनाकडून मानधन मंजूर झाले आहे. अशा व्यक्तींना मानधनाचे प्रदान करण्यासाठी थेट कोषागार कार्यालयातूनच सन्मानधारकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मानस आहे.

कोषगार कार्यालयामार्फत नाव नोंदणी केल्यास सन्मानधारकांच्या खात्यात तत्काळ मानधन जमा होईल. बँकेकडून खाते क्रमांक व नाव चुकीचे असल्यामुळे मानधन परत येणे, सारखेच आडनाव किंवा नाव असलेल्या व्यक्तीच्या किंवा इतर व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा होणे, बँकेचे नाव व शाखेचे नाव चुकीचे असणे, आयएफसीआय नंबर चूकीचा असणे आदी बाबी घडण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

ज्या सन्मानधारकांनी पॅन कार्ड, रद्द केलेला धनादेश, आधार कार्ड जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर (सामान्य) शाखा येथे जमा केलेला नाही त्यांनी व्यक्तीश: कार्यालयात हजर राहून कागदपत्रे जमा करावे.

ज्या सन्मानधारकांनी कार्यालयात उपस्थित राहून अद्यापपावेतो उक्त कागदपत्रे जमा केलेले नाही, त्यांनी तत्काळ कागदपत्रे जमा करावी जेणे करुन त्यांच्या मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे शक्य होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी कळविले आहे.






  Print






News - Nagpur




Related Photos