'शिक्षक भरती बेमुदत उपोषण' ला विदर्भातील अभीयोग्यता धारक शिक्षकांचा जाहीर पाठींबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
डीटीएड, बीएड धारक संघटनेच्या वतीने शिक्षक भरतीसाठी पुणे येथील शिक्षण आयुक्तालय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. याला विदर्भातील अभियोग्यता पात्रता धारक शिक्षकांनी पाठींबा दिला  आहे. उद्या ६  फेब्रुवारी  रोजी ला संविधान चौक नागपूर येथे विदर्भातील भावी बेरोजगार शिक्षक " पवित्र भीक मांगो आंदोलन" करून जमलेली भीक मुख्यमंत्री यांना "मुख्यमंत्री सहाय्यता निधी" मध्ये पाठून भाजप  सरकारचा जाहीर निषेध करेल.  माहिती डीटीएड, बीएड स्टूडंट असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष रमेश गाडरे यांनी दिली आहे.
शेवटची शिक्षक भरती २०१० मध्ये झाली होती. गत ८  वर्षापासुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अधिकतम असलेल्या डीटीएड, बीएड महाविद्यालयांमधून  आजपर्यंत  जवळपास १० लाख भावी शिक्षक बाहेर पडले. पण त्यांच्यासमोर २०१३ पासून सुरू करण्यात आलेली   शिक्षक पात्रता परीक्षा  ची बाधा निर्माण करण्यात आली. आजपर्यंत ५  वेळा टीईटी ची परीक्षा घेण्यात आली . ज्यात ३  ते ५ टक्क्याच्या वर निकाल लागला नाही. मग डिसेंबर २०१७ मध्ये शिक्षक अभी योग्यता आणि गुणवत्ता चाचणी घेण्यात आली.  ज्या आधारे २४ हजार शिक्षकांची भरती ६ महिन्यात करू असे आश्वासन  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये दिले. त्यानंतर २२ हजार  , २० हजार  आणि आता पावसाळी अधिवेशनात १८ हजार  शिक्षकांची भरती २  महिन्यात करू असे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती पदे रिक्त आहेत आणि आपल्याला किती जागांची भरती करायची आहे हे त्यांना कळलेच नाही.  
  शिक्षणाधिकारी यांची शिक्षण आयुक्त पुणे यांनी वारंवार व्हिडिओ कॉन्फरेन्स घेऊन बिंदू नामावली अद्ययावत करण्या बाबत सूचना दिल्या. पण सरकारी काम अन  बारा महिने थांब हीच गत झाली. शिक्षण आयुक्त यांनी आधी २२ जानेवारी नंतर ३ फेब्रुवारी आणि आता १२ फेब्रुवारी २०१९ ला शिक्षक भरतीची जाहिरात येईल असे सांगितले आहे. पण आज १० टक्के  सवर्ण आरक्षण सर्वत्र लागु झाल्या मुळे पुन्हा बिंदू नामावली मध्ये त्या नुसार तरतूद करावी लागेल. मग ५  मार्च आधी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करू व आचार संहिता मध्ये शिक्षक भरती अडकणार नाही असे सांगणारे शिक्षण मंत्री कशी काय भरती करणार की पुन्हा विनोद केला असे समजायचे, असे गाडरे यांनी म्हटले आहे. 
 मुख्यमंत्री शिक्षणाविषयी गंभीर नाहीत का? आजपर्यंत शिक्षक भरती बाबत एक शब्द सुद्धा काढला नाही. महाराष्ट्र शासन  अभी योग्यता शिक्षकांच्या भवितव्य बाबत गंभीर नाही का? डीटीएड , बीएड  करणारी मुले ही गोर गरीब, कामगार आणि शेतकर्‍यांची आहेत. त्यांच्याकडून टीईटी आणि टिएआयटी परीक्षेच्या नावावर नुसता महसूल गोळा केला का शासनाने? जर असे असेल तर आता आम्हीच भीक मागून शासनाची तिजोरी भरायची का?
 उद्या ६  फेब्रुवारी  रोजी ला संविधान चौक नागपूर येथे विदर्भातील भावी बेरोजगार शिक्षक " पवित्र भीक मांगो आंदोलन" करून जमलेली भीक मुख्यमंत्री यांना "मुख्यमंत्री सहाय्यता निधी" मध्ये पाठून भाजप  सरकारचा जाहीर निषेध करेल. त्याच बरोबर पुणे येथे ४ फेब्रुवारी पासून चालू झालेल्या "शिक्षक भरती बेमुदत उपोषण" ला विदर्भातील अभी योग्यता धारक शिक्षक जाहीर पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहतील . जोपर्यंत २४ हजार शिक्षकांच्या भरतीची जाहिरात पवित्र पोर्टल वर येत नाही तो पर्यन्त विदर्भातील अभी योग्यता धारक शिक्षक शांत बसणार नाही, असेही गाडरे यांनी म्हटले आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-02-05


Related Photos