राष्ट्रीय आर्थिक दृष्टया दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत : महिला समाज विद्यालयाचे ८ विद्यार्थी पात्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
डिसेंबर २०१७ अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्टया दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत महिला समाज माध्यमिक विद्यालयातील ३३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यालयाचे ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रतीवर्ष १२ हजार शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन विज्ञान शिक्षक प्रमोद सेलोकर यांचे लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धारस्कर, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विशाखा गुप्ते, नुतन मोघे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-05


Related Photos