पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जवेली येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न


-एकसंघ समाज हाच सर्वांगीण विकासाचा खरा स्रोत - ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री  ना.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजने अंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जवेली येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 
यावेळी बोलतांना ना. आत्राम म्हणाले की , एकसंघ समाज निर्मितीसाठी ही वास्तू प्रेरणास्त्रोत ठरावी आणि त्यातून गावाचा व पर्यायाने तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी आशा व्यक्त केली. पुढे म्हणाले , समाजात विविध विचारांची लोकं वावरत असतात. पण मंदिरात प्रवेश करतांना त्यांच्या मनात कुठलाही विचार नसतो तर श्रद्धा असते. हीच श्रद्धा समाजात वावरतांना प्रत्येकाच्या मनात असू द्या. विचारांनी आपण कोणीही असू द्या त्याने काहीही फरक पडत नाही. पण समाज म्हणून आपण सर्व सदैव एकत्र असलो पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपला सर्वांगीण विकास शक्य आहे. येणाऱ्या पिढीला उज्वल भविष्यकाळ प्रदान करण्यासाठी एकसंघ समाज निर्मितीतून होणाऱ्या विकासाची नितांत आवश्यकता असल्याचे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले . 
यावेळी सरपंच रुनीता तलांडे, पं. स. सभापती बेबीताई लेकामी, पं. स. सदस्य जनार्धन नल्लावार, उपसरपंच दशरथ अडगोपुलवार, ग्रा. पं. सचिव गेडाम, कमल वेलादी, मीना खोब्रागडे, तिरुपती मडावी, विजय आत्राम, विजय नल्लावर आदींसोबतच मोठ्या प्रमाणात जवेली ग्रामवासीय उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-05


Related Photos