महत्वाच्या बातम्या

 समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५०  टक्क्याने वाढ करा : आमदार विनोद अग्रवाल यांनी घेतली शिक्षण मंत्र्यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत ६०८० कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्य करीत आहेत. दरवर्षी १० टक्के मानधनात वाढ होणे अपेक्षित असतांना मागील ५ वर्षात कसलीही मानधन वाढ समग्र शिक्षा अंतर्गत कार्य करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेली नाही. मानधन वाढीचे संपूर्ण अधिकार प्रधान सचिव शालेय शिक्षण यांना असतान सुद्धा अद्याप मानधन वाढीची प्रतीक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संपताना दिसत नसल्याने गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मंत्रालय मुंबई येथे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्क्याने वाढ करण्याची मागणी केली. यावेळी राज्याचे शिक्षण सचिव व प्रकल्प संचालक उपस्थित होते.


मानधन वाढ केल्याने राज्य शासनावर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही : आमदार विनोद अग्रवाल
भारत सरकारकडून PAB नुसार ८४०३.३३ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या राज्य व जिल्हा स्तरावरील व्यवस्थापन अंतर्गत कार्यरत ७०६ कर्मचार्यांच्या मानधनाकरिता अंदाजे ३६८१.४३ लक्ष रुपयांचा खर्च येत असून सदर कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्क्याने वाढ केल्यास अंदाजे ५१९३.४७ लक्ष खर्च होईल यामुळे सदर खर्च व्यवस्थापन अंतर्गत मंजूर तरतुदी मधून  केल्यास राज्य शासनावर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos