महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा येथे अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर संपन्न


- जि. प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिलांविषयक व विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच महिलांच्या स्थानिक विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी २५ मे रोजी सिरोंचा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जि.प. माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिबिराच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी तहसीलदार सय्यद हमीद उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. पी. कन्नाके, बालविकास प्रकल्प अधिकारी एच. एस. पडले, कृषी अधिकारी (पंचायत) पांचाळ, मंडळ कृषी अधिकारी रंजना बोबडे, तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक ओमप्रकाश लांजेवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एम. डी. शानू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवा येनगंधुला आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवारांकडून सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून, दीप प्रज्वलित करून वंदन करण्यात आले. त्यानंतर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी एच. एस. पटले यांनी प्रास्ताविक केले. प्रस्ताविकेतून त्यांनी स्त्री शक्ती समाधान शिबिराबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध मान्यवरांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन करतानाच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी समोर येऊन समस्या व तक्रारी मांडण्याचे आवाहन केले.

उद्घाटक म्हणून आपल्या मार्गदर्शनात भाग्यश्री आत्राम यांनी समस्याग्रस्त, पीडित महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळाला आहे. त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक व्हावी. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन केले आहे. या माध्यमातून महिलांचे विविध समस्या आणि तक्रारींचे निराकरण केले जाणार असल्याचे सांगितले.

स्त्री शक्ती समाधान शिबिरात सिरोंचा तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश महिलांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos