महत्वाच्या बातम्या

 तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच शिबिराचे आयोजन : आमदार धर्मराव बाबा आत्राम


- अहेरी येथे स्त्री शक्ती समाधान शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे भरपूर तक्रारी असतात. मात्र, तक्रारी घेऊन महिला समोर येत नाहीत. महिलांचे विविध समस्या आणि तक्रार जाणून घेऊन त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन केल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या महिलांविषयक व विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच महिलांच्या स्थानिक विविध शासकीय विभागांशी संबंधीत समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी २५ मे रोजी स्थानीक तहसील कार्यालय सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी तहसीलदार दिनकर खोत, प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल चव्हाण,मुख्याधिकारी नाना दाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरागोंवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, मखमुर शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यांसाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, यासाठी स्वतः महिलांनी पुढे येऊन समस्या मांडण्याची गरज आहे. या शिबिराचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी समोर यावे आणि समस्या मांडावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल चव्हाण यांनी शिबिराबाबत योग्य माहिती देत महिलांच्या विविध विभागांशी संबंधित विविध समस्या प्रधान्याने सोडवीन्यात येणार असल्याचे सांगितले. आयोजित शिबिरात तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प कार्यालयाचे पर्यवेक्षक तसेच आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शिबिरात ७३ तक्रारींचे तत्काळ निराकरण

स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या १३७  तक्रारींपैकी ७३ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले तर उर्वरित तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल चव्हाण यांनी दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos