महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज बनले पूर्व विदर्भातील मोठे कापड बाजारपेठ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय संस्कृती रितीरिवाजानुसार मार्च ते मे महिना म्हणजे लग्न कार्याची पर्वणी. त्यामुळे या कालावधीत लग्न कार्यासाठी कपड्यांच्या खरेदीला जणू उतच येतो. याचाच परिपाक मोठ्या शहरातील प्रत्येक कापड दुकान लग्नाच्या बस्त्यासाठी ग्राहकांनी गजबजून जाते. मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळते. अशीच स्थिती गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज शहरात दिसून येते.
कपड्यांची बाजारपेठ म्हणून देसाईगंज व्यापारनगरी प्रसिध्द आहे. आता तर उत्कृष्ट कापड तसेच लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी येथे चार जिल्ह्यातील ग्राहक दाखल होत असल्याने देसाईगंज शहर मोठी कापड बाजारपेठ म्हणून प्रसिद्धीस येत आहे.
देसाईगंज शहरात रेल्वे, बस तसेच दळणवळणाची इतर साधने सहज उपलब्ध होत असल्याने आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर तसेच गडचिरोली आदी चार जिल्ह्यांतील ग्राहक येथे कापड खरेदीसाठी येतात. विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची ये-जा सुरू असते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos