महत्वाच्या बातम्या

 आय.आय.एच.टी. बरगढ व वेंकटगिरी येथे प्रथम सत्रासाठी २० जून पर्यंत अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.  प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई व औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज २० जूनपर्यंत मागविण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज २० जूनपर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमूना प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे  वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन यांनी कळविले आहे.

विदर्भातील ११ जिल्हयातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,  प्रशासकीय इमारत क्रं. २, ८ वा माळा, बि विंग, सिव्हील लाईन्स, नागापूर ४४०००१ दुरध्वनी क्रमांक ०७१२-२५३७९२७ यांचे कडून प्राप्त करून घ्यावा. तसेच विहीत पात्रता व अर्जाचा नमुना कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेला आहे.    





  Print






News - Nagpur




Related Photos