ट्रकची दुचाकीस धडक, एक ठार एक गंभीर जखमी


- वरोरा तालुक्यातील  घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
दुभाजक ओलांडून जात असताना मागून येणाऱ्या  दुचाकीस ट्रकने धडक दिल्याने अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना नागपूर - चंद्रपूर मार्गावरील माजरा गावानजीक आज ४ फेब्रुवारी रोजी घडली.
अरूण मंगरू दडमल (४५) रा. माजरा असे मृतकाचे नाव आहे. तर विठ्ठल दडमल हा गंभीर जखमी झाला आहे. एमएच ३४ क्यूए ६६५८ क्रमांकाच्या दुचाकीने अरूण दडमल आणि विठ्ठल दडमल हे चिनोरा गावाकडून जात असताना दुभाजक ओलांडून जात होते. दरम्यान चंद्रपूरकडून नागपूरकडे जात असलेल्या एचआर ७३ ए ९१२२ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील  अरूण दडमल जागीच ठार झाला. गंभीर जखमी विठ्ठल दडमल याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-04


Related Photos