प्रशासनाच्या आवाहनानंतरही ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ चे अर्ज पाठविण्यासाठी नागरीकांची तुफान गर्दी


- अफवावंर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्यात बेटी पढाव, बेटी बचाव या योजनेंतर्गत २ लाख रूपये मिळतात, असे समजून बहुसंख्य नागरीक अर्ज दिल्ली येथील एका पत्त्यावर पाठवित आहेत. मात्र ही अफवा असल्याचे आवाहन करण्यात येत असतानाही  नागरीक डाक कार्यालयात तुफान गर्दी करीत असल्याचे दिसून आले. 
बेटी पढाव, बेटी बचाओ या योजनेंतर्गत २ लाख रूपये देण्याची कोणतीही योजना नाही. तसेच  शासनाने असा कोणताही निर्णयसुध्दा घेतलेला नाही. तसेच कोणत्याही सुचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून अर्ज पाठविण्याची तसदी घेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले आहे.
प्रशासनाच्या आवाहनानंतरही गडचिरोली येथील डाक कार्यालयात सकाळपासूनच शहरातील तसेच खेड्यापाड्यातील नागरीकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. डाक कर्मचारी सुध्दा या गर्दीने वैतागले असणारच. सकाळी चामोर्शी मार्गावर वाहनांची तसेच डाक कार्यालयाच्या आवारात महिला, पुरूषांची प्रचंड गर्दी होती. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-04


Related Photos