महत्वाच्या बातम्या

  धान खरेदी केंद्रावर १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी


- ऑनलाईन नोंदणीची मुदत ३१ मे पर्यंत

- जिल्ह्यात १८८ धान खरेदी केंद्र सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आधारभुत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक ३१ मे २०२३ पर्यत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात 188 धान खरेदी केंद्र सुरू असून १८ हजार ४२० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदती आधी जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.एस पाटील यांनी केले आहे.

भंडारा तालुक्यातील १९ धान खरेदी केंद्रामध्ये २ हजार ७२ शेतकऱ्यांची, मोहाडी तालुक्यातील २४ धान खरेदी केंद्रामध्ये ३८९ शेतकऱ्यांची, तुमसर तालुक्यातील ३० धान खरेदी केंद्रामध्ये १ हजार ४०२ शेतकऱ्यांची, लाखनी तालुक्यातील २२ धान खरेदी केंद्रामध्ये ५ हजार ८०४ शेतकऱ्यांची, साकोली तालुक्यातील २७ धान खरेदी केंद्रामध्ये ६ हजार ३६३ शेतकऱ्यांची, लाखांदुर तालुक्यातील २९ खरेदी केंद्रामध्ये ७२८ शेतकऱ्यांची, पवनी तालुक्यातील ३७ केंद्रामध्ये १ हजार ६५४ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे व महानोंदणी ॲप व ईतर खरेदी केंद्रावर ८ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.


जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरेदी केंद्रावर नोंदणी करिता जातांना शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बॅंक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रासह नोंदणी केंद्रावर जावून आपली नोंदणी करावी. तसेच ज्या सबएजंट संस्थांचे आय. डी. सुरू आहेत त्या संस्थांनी धान खरेदी सुरू करावी. 





  Print






News - Bhandara




Related Photos