स्काऊट गाईड आदर्श नागरिक घडविणारी चळवळ : कर्नल जोशी


-३५ वा स्काऊड गाईडस जिल्हा मेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
शालेय, महाविद्यालयीन मुलां-मुलींना योग्य संस्कार मिळाल्यास आदर्श पिढी निर्माण होवू शकते. आजच्या असुरक्षित वातारणात साहस, जागरुकता, शिस्त, समयसुचकता व देशप्रेम युवा पिढीमध्ये निर्माण करण्याची नितांत गरज असून या दृष्टीकोणातून स्काऊट गाईड चळवळ प्रशंसनिय कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने स्काऊट गाईड आदर्श नागरिक घडविणारी चळवळ आहे. असे प्रतिपादन एन.सी.सी.चे कमांडर कर्नल पद्ममनाभ जोशी यांनी यांनी केले. स्काऊट गाईडच्या ३५ व्या जिल्हा मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थावरुन जोशी बोलत होते.  स्थानिक एडव्हेंचर हिल्स जिल्हा आपत्ती प्रशिक्षण केंद्र येथे केले. 
भारत स्काऊट गाईडच्या जिल्हा संस्थेच्या वतीने ३५ वा तीन दिवसीय जिल्हा मेळावा ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत असून यात १२०० मुलां-मुलींनी भाग घेतलेला आहे. यात ८० शाळा सहभागी झाल्या असून स्काऊट गाईडच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध उपक्रमांचा मेळाव्यात सहभाग राहणार आहे. स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त न.प. बांधकाम सभापती बंटीभाऊ गोसावी , न.प शिक्षण सभापती अर्चनाताई आगे, स्काऊटचे जिल्हाध्यक्ष सतिश राऊत, जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर, सुवर्णमाला थेरे, समाजसेवक विजय राठी, अनिल नरेडी, इमरान राही, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, रामकुमार जयस्वाल , शकुंतलाताई चौधरी, किशोर सोनटक्के, रामदासजी वडाळकर, अंबादासजी वानखेडे, प्राचार्य मदन मोहता, रामभाऊ बाचले, जिल्हा सचिव, किरण जंगले , भरतकुमार सोनटक्के , मुरलीधर बेलखोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनीषा सावळे म्हणाल्या, सुजाण नागरिक घडविले जावू शकतात आणि या करिता गरज आहे ती, शालेय जीवनातच मुलांमुलींना योग्य प्रशिक्षण देण्याची या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड चळवळीतून आदर्श व्यक्तिमत्व घडविण्याचे प्रशिक्षण विविध उपक्रमांतून दिले जात आहे. ही बाब कौतूकास्पद आहे.
बोलतांना न.प.शिक्षण सभापती अर्चना आगे म्हणाल्या देशप्रेमाने भारावलेली व्यक्तिच देशाकरीता आपले सर्वस्व अर्पण करू शकते आणि याबाबतचे संस्कार बाल मनावरच खऱ्या अर्थाने बिंबविले जाऊ शकतात. या दृष्टीकोनातून स्काऊट गाईउडची चळवळ प्रशंसनिय कार्य करीत आहे. यावेळी स्काऊटचे अध्यक्ष सतिश राऊत व समाजसेवक इमरान राही यांनी स्काऊट गाईडस्ना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर यांनी केले. गाईड कॅप्टन सिम्ता ढोकणे व जिल्हा गाईड संघटक वैशाली अवथळे यांनी संचालन तर सतिश इंगोले यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरीता जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, विवेक कहाळे, रोव्हर लिडर संतोष तुरक, रोव्हर लिडर प्रा.रविंद्र गुजरकर, स्वप्नील शिंगाडे, संजय केवदे हे अथक प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमांची सांगता वंदे मातरम या देशभक्तीपर नृत्याने झाली .  Print


News - Wardha | Posted : 2019-02-04


Related Photos