मुलाने केला वृद्ध पित्याचा खून : भंडारा जिल्ह्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  भंडारा :
घरगुती वादातून जब्बर मारहाण करून मुलाने आपल्या वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्याच्या पचारा येथे ३ फेब्रुवारी रोजीच्या रात्री घडली. तीर्थराज वरकडे (७०) असे मृत पित्याचे नाव आहे . 
मुलगा आणि वडिल यांच्यात  शुल्लक कारणावरून वाद सुरू झाला.  राजू तीर्थराज वरकडे (४५) या मुलाचा राग विकोप्याला गेल्याने त्याने वडिलांला काठीने बेदम मारहाण केली. यातच वडिलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीर्थराजची पत्नी कमलाबाई यांनी तुमरसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-04


Related Photos