महत्वाच्या बातम्या

 ग्रामपंचायत द्वारे शेतकऱ्यांचे दिशाभूल आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील  नांदगाव पोडे येथील शेत शिवारामधे खाजगी कोळशा कंपनी निर्माण होण्याचे संकेत चिन्ह दिसत आहे. कंपनीने ग्रामपंचायत नांदगाव पोडे ला सर्वे संदर्भात पत्र दिले. 

परंतु ते पत्र लपविण्याचे काम ग्रामपंचायत मधील पदावर असलेल्या नेते मंडळींनी केले आहे. अश्या प्रकारे ग्रामपंचायत द्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे आरोप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सत्य परिस्थिती पासून दूर ठेवले असून सहन केल्या जाणार नाही असा इशारा देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत मध्ये कोणतेही पत्र आले तर दवंडी च्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचेल असे कार्य  करावे अन्यथा त्यावर योग्य पाऊल उचलल्या जाणार. शेतजामिनी ह्या शेतकर्यांच्या मालकी हक्काच्या असल्यामुळे जो कोणताही निर्णय घेतला जाईल तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन घेतला जावा या मागणी साठी युवक काँग्रेस चे सचिव प्रीतम पाटणकर, सदस्य  सुनील खापणे,  देवानंद शेंडे, प्रशांत धोटे शाखा अध्यक्ष काँग्रेस कमिटी,  विजय भोंगळे, रामाजी उरकुडे, पुरुषोत्तम पोडे, अनिल पोडे, चंदू भाऊ भोंगळे बाळा खापणे इतर पदाधिकऱ्यांनी निवेदन द्वारे दिले.





  Print






News - Chandrapur




Related Photos