कुंभमेळ्यात इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत १० हजार तरूण-तरूणींनी घेतली नागा साधू होण्याची दीक्षा


वृत्तसंस्था / प्रयागराज : येथे सुरू असलेला कुंभमेळ्यात भारतातील  सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यामध्ये इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत दहा हजार तरूण-तरूणींनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. 
 सनातन धर्मांमध्ये नागा साधू बनणे तपस्यातील सर्वात कठीण विधपैकी एक आहे.  उज्जैनमधील बारावीचा टॉपर असलेल्या घनश्याम गिरी याने सुद्धा मोह-माया टाळून नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. दहा हजार सुशिक्षीत तरूणांनी प्रयागराज कुंभमेळ्यात सामूहिक दीक्षा समारंभात नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेण्याच्या परंपरेप्रमाणे त्यांनी आपले केस अर्पण केले. त्यांनी केवळ एक शेंडी (डोक्यावर केसांचा गुच्छ) ठेवली. महाकुंभच्या दरम्यान त्यांनी स्वत:चे आणि परिवाराचे पिंडदान केले. त्यानंतर रात्रभर ओम नम: शिवाय या मंत्राचा जाप करावा लागतो. त्यानंतर त्यांना नागा साधू म्हणून मान्यता मिळाली.  
नागा साधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात. तसेच यासाठी तब्बल सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. तर नवीन सदस्याला फक्त लंगोटशिवाय कोणतेही वस्र परिधान करण्यास मनाई आहे. कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांच्या लंगोटचे त्याग करु शकतात. 
नागा साधूंना त्यांच्या आयुष्यात खूप नियमांचे पालन करावे लागते. नागा साधू फक्त दिवसातून एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.   Print


News - World | Posted : 2019-02-04


Related Photos