महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात


- पोलीस अधीक्षक यांचे हस्ते १० वा रुपयाचा धनादेश कुटुंबियांना स्वाधीन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी वसंत विस्तारी वैद्य यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखून ॲक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी संध्या वसंत वैद्य यांना आर्थीक मदत स्वरुपात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता तसेच ॲक्सिस बँकेचे सर्कल हेड राजीव कुमार, क्लस्टर हेड अजीत श्रीवास्तव व शाखा व्यवस्थापक राकेश राजेंद्र वल्लालवार यांचे उपस्थितीत मूल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos