वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या वाघाने वनाधिकाऱ्यावर केला हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 राष्ट्रीय महामार्ग क्र. सातवर शनिवारी एका वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाच्या शोधासाठी जंगलात गेलेल्या  वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांच्यावर जखमी वाघाने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले आहेत . त्यांना आधी देवलापर प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक वनक्षेत्रातलगतच्या हरणकुंडजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडून जाणाऱ्या वाघाला वाहनाने धडक दिली. त्यानंतर ते वाहन पुढे निघून गेले. घटनास्थळी रक्ताचे डाग होते. वन कर्मचाऱ्यांनी महामार्ग परिसरात १०० किलोमीटर अंतरावर वाघाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. रात्रीची वेळ आणि जंगल घनदाट असल्याने जखमी वाघाचा शोध घेता आला नाही.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-04


Related Photos