आलापल्लीत ५४ आदिवासी जोडपे अडकले विवाह बंधनात : ५ आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश


-  सामूहिक विवाह सोहळा संपन्न 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी : 
पोलिस अधिक्षक कार्यालय गडचिरोली, मैत्री परिवार संस्था नागपूर व साई भक्त सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  आज ३ फेब्रुवारी रोजी क्रिडा संकुल आलापल्ली येथील मैदानावर गडचिरोली जिल्हातील एकूण ५४ आदिवासी जोडपे आदिवासी समाजाच्या रितीरिवाजा नूसार आदिवासी पंरपरा कायम ठेवत मंत्रोपचारात विवाहबंधनात जोडले गेलेत. त्यात ५ आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश आहे. 
 या विवाह सोहळ्याला जिल्हाचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम ,पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीचे न्यायाधिश सुनिल महाले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ.मोहीत गर्ग, अजय बंसल, सीआरपीएफ चे कमांडेंन्ट श्रीराम मीना, नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंचा सुगंधा मडावी, डाॅ.कुंभारे, मैत्री परिवार नागपूरचे प्रमोद पेंडसे, गंगाराम सासरकर, निरंजनभक्त सेवक समीतीचे सुनिल जैस्वाल, सामाजिक कार्यकर्ते  वासेकर, साई  दत्ता शिर्के आदींची उपस्थिती होती.
 गडचिरोली पोलिस दलामार्फत जिल्हातील आदिवासी जणतेसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आर्थिक परिस्थिती अभावी आपल्या मुला-मुलीचे विवाह थाटात करु शकत नाही. त्यामुळे त्यांची स्वप्णपुर्ति करण्यासाठी पोलिस विभाग व मैत्री परिवार संस्थेच्या वतीने हा सोहळा लाखो लोकांचे उपस्थितीत संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात ५४ आदिवासी जोडपे विवाहबध्द झालेत. त्यात गडचिरोली जिल्हातील पाच आत्मसर्मित शरणागत नक्षल्यांचा समावेश होता. या सर्व नव विवाह जोडप्यांना पोलिस विभाग व मैत्री परिवारा कडून जिवनापयोगी वस्तू पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे हस्ते देण्यात आल्या.
यावेळी पालकमंत्री आत्राम बोलतांना म्हणाले , आदिवासी समाजातील  लोकांच्या कल्यानासाठी शासन व प्रशासन कठीबध्द आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थीनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजाचा विकास करावा. कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब करु नये. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी केले. 
याप्रसंगी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून पोलिस विभाग आदिवासी समाजासाठी करित असलेल्या कामाची माहिती दिली. 
हा विवाह सोहळा यशस्वीतेसाठी अप्पर पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांचेसह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच उडान फाउंडेशनचे सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य मीळाले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रा.माधुरी यावलकर यांनी केले.
   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-03


Related Photos