महत्वाच्या बातम्या

 पोलीस स्टेशन मुल येथील गोळीबाराच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद : चंद्रपूर जिल्हा पोलीसांची यशस्वी कामगिरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसींग चंदेलसींग रावत (६०) रा. मुल यांच्यावर ११ मे २०२३ रोजी रात्रो ०९:१५ वा. ते ०९:३० वाजे दरम्यान चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, शाखा मुल समोर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या मारोती सुझुकी स्विफ्ट कार मधुन आलेल्या अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांना जिवे ठार मारण्याच्या उददेशाने त्यांचेवर बंदुकीने गोळया झाडल्या त्यामध्ये ते जखमी झाले, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्या संदर्भात पोलीस ठाणे मुल येथे संतोषसींग चंदेलसींग रावत यांच्या तकारीवरून अप.क्र १७८/२३ कलम ३०७, ३४ भा.द.वि. सह कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांची एकुण १६ पथके तयार करून पाहीजे असलेल्या आरोपींची शोध मोहीम राबवीली. तपासादरम्यान आरोपींनी स्वतःची ओळख लपविण्यासाठी बुरखा परीधान फैला होता. तसेच गुन्हयात वापरलेल्या गाडीची ओळख लपविण्यासाठी बनावट वाहन क्रमांक वापरल्याचे दिसुन आले. आरोपी व वाहनाच्या शोध मोहीमे दरम्यान विविध तपास पथकांमार्फत कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला. या पथकांकडुन केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान १) राजवीर कुवरलाल यादव (36) २) अमर कुंवरलाल यादव (29), दोन्ही रा. चंद्रशेखर आझाद चौक बाबुपेठ चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल विचारणा केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

यातील फिर्यादी यांनी आरोपींचे मार्फत काही मुलांकडुन वे.को.लि. मध्ये नौकरी लावुन देतो म्हणुन पैसे घेतले होते. परंतु त्यांना नोकरी लावुन दिली नाही व घेतलेली रक्कम सुध्दा वारंवार मागुनही परत केली नाही. याच रागातून आरोपींनी फिर्यादी यांचेवर जिवे मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून पसार झाले होते. असे प्राथमिक तपासावरून दिसुन आले आहे. तरी आरोपींकडे गुन्हयाबाबत सर्वकप दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदुर हे करीत असुन सदर गुन्हयाचे तपास कामी आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, मल्लिकार्जुन इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, पो.नि. सतिषसिंह राजपुत पोलीस ठाणे चंद्रपुर शहर, पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, पो.नि. सुमीत परतेकी पोलीस ठाणे मुल, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे मुल, पोंभुर्णा, गोंडपीपरी, सावली, पाथरी, उमरी पोतदार, कोठारी, सिंदेवाही, बल्लारशाह, चंद्रपुर शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेवुन सदर आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos