महत्वाच्या बातम्या

 पोलीस मुख्यालय येथे पार पडला उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा बदली निरोप समारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस विभाग असो किंवा इतर प्रशासकिय विभाग असो बदली हा सर्व शासकिय अधिकारी अंगलदार यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. तसेच बदली होणे हा प्रशासकिय भाग आहे. अशीच गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी कार्यकाळ पूर्ण केलेल्या तीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज २३ मे २०१३ रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडला.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणित गिल्डा यांची उपविभाग मिरज जि. सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा स्वप्नील जाधव यांची उपविभाग दौंड जि. पुणे व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर यांची उपविभाग कराड जि. सातारा येथे बदली झालेली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले तीनही सत्कारमुर्ती यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सेवेबाबत मनोगत व्यक्त करून गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव सांगीतले. यासोबतच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये तीनही उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

सदर बदली निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी मयूर भुजबळ व सर्व शाखा प्रभारी अधिकारी हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos