रस्ते अपघात आणि सुरक्षा


वाहन आणि अपघात व  त्यातून होणारे मृत्यू यावर एकच उपाय तो म्हणजे खबरदारीचा, 4 ते 10  फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख.....

 वाहन संख्या वाढणे आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढणे सातत्याने सुरुच आहे.  ज्या गतीने वाहन संख्या वाढत आहे, त्याच गतीने रस्ता सुरक्षा ही अधिक गंभीर समस्या बनत आहे. तांत्रिक बिघाडाने होणारे अपघात आपण समजू शकतो मात्र ज्यावेळी मानवी स्वभावातील दोषांमुळे अपघात  होतात त्यावेळी जरा विचार करावा असे सांगावेसे वाटते.
  भारतात होणाऱ्या अपघातांचा अभ्यास केला तर आकडेवारी सांगते की, प्राणघातक ठरणाऱ्या सर्व अपघातांमध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण अधिक आहे.  सुरक्षा मानके आणि सुरक्षा उपायांचे पालन न केल्याने हे अपघात होतात असेही निदर्शनास आले आहे.
  दुचाकी ही केवळ 2 जणांसाठी असणारी व्यवस्था आहे. मात्र हल्ली दुचाकीवर तीन जण जाताना आपणास दिसतील.  हे नियमांचे सर्रास उल्लंघन आहे.  मात्र त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही.  परिणामी अपघात झाल्याच्या स्थितीत मरण पावणाऱ्यांची  संख्या वाढते.
   दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे असा  कायदा आहे.  शहरी भागात वाहन चालवताना गतीमर्यादा कमी  नाही.  त्यामुळे शहरी भागात वाहन चालवताना हेल्मेट वापरावे की नाही यावर सातत्याने वाद चालू असतात.  मात्र या वादात न पडता हेल्मेट घातले तर कोणतेही नुकसान नसून फायदाच आहे.  कारण अपघात झाल्याच्या स्थितीत किमान प्राण वाचण्याची खात्री राहते.  अपघात डोक्याला अर्थात  मेंदूला इजा झाल्याने प्राण जाण्याचा धोका सर्वाधिक असतो.
 महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट आवश्यक आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवावी.  वाहन चालवतांना रस्त्यांच्या डाव्या कडेने वाहन चालवावे जेणेकरुन मागील बाजूने येणारे वाहन धडकण्याचा धोका टाळता येतो.  हायवेवर दुचाकी चालवताना आपण हेडलाईट सुरु ठेवावा, होय दिवसाठी हेडलाईट सुरु ठेवावा असा नियम अमेरिकेत आहे.  या मानकाचा वापर आता आपल्या देशातही सुरु झाला आहे.
 सुरक्षा मानके निर्धारित करण्यापूर्वी त्यावर अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातूनच त्याला नियमांमध्ये बदलले जाते त्यामुळे जी सुरक्षा मानके निश्चित  करण्यात आली आहेत.  त्याचे आपण पालन करायलाच हवे असे निश्चितपणे सांगता येते. सुरक्षित रहा..... इतरांनाही सुरक्षित ठेवा....

             "  सडक सुरक्षा- जीवन रक्षा "
 - प्रशांत दैठणकर,  
जिल्हा माहिती अधिकारी
 9823199466  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-02


Related Photos