महत्वाच्या बातम्या

 महाज्योतीच्या जेईई दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांचे यश


- १० विद्यार्थ्यांना ९० टक्के परसेंटाईल स्कोर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जेईई म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. जेईई मेन्स आणि जेईई एडव्हांस अशी दोन टप्प्यांत होणारी परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. नुकताच जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर करण्यात आला. त्यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई प्रशिक्षण योजनेतील १० विद्यार्थी ९० टक्क्यावर परसेंटाईल स्कोर घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. तर इतर विद्यार्थी ८०  ते ८५ परसेंटाईल स्कोर घेऊन मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झालेली आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय महाज्योतीला दिलेले आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई या परिक्षेचे प्रशिक्षण महाज्योती मार्फत मोफत देण्यात येते. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब तसेच इंटरनेट डाटा पुरविला जातो. अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकाचा संच घरपोच दिल्या जातो. तज्ञ प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाते. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाज्योती  नागपूरचे  व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी जेईईच्या दुसऱ्या सत्रात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





  Print






News - Wardha




Related Photos