महत्वाच्या बातम्या

 अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प १ व २ च्यावतीने २५ मे रोजी सकाळी ११:०० वाजता विकास भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिर सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्धा तालुकास्तरीय या शिबिरात महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. शिबिराचा तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार रमेश कोळपे व गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos