कुष्ठरोग निवारण पंधरवाड्याचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवाडा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. व्यापक स्तरावर नागरिक स्वयंस्फुर्तीने तपासणीस येतील याकरीता जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग अभियान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त ३० जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाड्याचे उद्घाटन करण्यात आले. 
सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रा.ज.पराडकर यांनी कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.सीमा यादव, रविंद्र जाधव, श्री.मुडपीलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करुन उपस्थितांचे आभार यु.एस.राठोड यांनी मानले.

   Print


News - Gondia | Posted : 2019-02-02


Related Photos