महत्वाच्या बातम्या

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धाच्या सहकार्याने २५ मे रोजी एक दिवसीय छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन अनेकांत स्वाध्याय मंदिर वर्धा येथे करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ वर्धा विधानसभा क्षेत्रातील युवक व युवतींना होणार आहे.

इयत्ता १० वी, १२ वी नंतर करीअरच्या संधी, विविध प्रवेश परीक्षा, १२ वी नंतर पदवी, पदविकेसाठी प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारीत शिक्षण व प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा इत्यादीबाबत शिबिरामध्ये तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अनेकांत स्वाध्याय मंदिर, इंगोले चौक येथे सकाळी ९.३० वाजता या युवाशक्ती करीअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात सर्वस्तरावरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरात विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे उत्तर तज्ञांकडून मिळणार आहे.

मार्गदर्शन शिबिरासाठी शासनातर्फे क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या क्यूआर कोडला मोबाईलद्वारे स्कॅन करुन आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीचा उपयोग शासनाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी होईल. ही नोंदणी पुर्णपणे मोफत असून आयटीआय, इयत्ता १०, १२ वी, पदवी, पदविका, नोकरीच्या शोधात असलेले तरुण या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना हे शिबिर व मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे, असे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्वेता कुलकर्णी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos