महत्वाच्या बातम्या

 पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक


- खाते आधारशी जोडण्याची सुविधा गावातच

- आधार न जोडल्यास हप्ता जमा होण्यास अडचण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी खाते जोडले नसतील त्यांनी ते तातडीने जोडून घ्यावे. खाते आधारला न जोडल्यास योजनेचा पुढील हप्ता बँक खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबास प्रती हप्ता दोन हजार याप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जुन महिन्यात जमा केला जाणार आहे. त्यापुर्वी खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 18 हजार 751 लाभार्थ्यांनी खात्यास आधारशी जोडणी केली आहे. तसेच 27 हजार 491 शेतकऱ्यांची  ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे.

लाभार्थ्यांना आधार जोडणीची सुविधा त्यांच्या गावातील पोष्ट मास्टर मार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आधारकार्ड, मोबाईल क्रमांक याआधारे गावातील पोष्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोष्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल. सदर पध्दत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.

योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी बँक खात्याला आधार जोडणे आवश्यक असल्याने इंडियन पोष्ट पेमेंट बँकेमार्फत आधार जोडणीची मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी कळविले आहे. 





  Print






News - Wardha




Related Photos