महत्वाच्या बातम्या

 १ जूनपासून निर्यातीपूर्वी कफ सिरपची होणार चाचणी : केंद्र सरकारचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : हिंदुस्थानी कंपन्यांचे कफ सिरप पिऊन गॅम्बिया आणि उज्बेकिस्तानच्या डझनभर मुलांचा मृत्यू झाल्याचे आरोप मागच्या काही महिन्यात झाले होते. अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आता हिंदुस्थानात तयार झालेले कफ सिरप निर्यातीपूर्वी त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित कंपनीला सर्टिफिकेट मिळेल आणि त्यानंतरच निर्यातीची परवानगी देण्यात येईल. १ जूनपासून निर्यातीपूर्वी सर्व कफ सिरपची चाचणी लागू होणार आहे.

कफ सिरपांची चाचणी केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे. यामध्ये चंदीगड, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, गुवाहाटी येथील प्रयोगशाळेंचा समावेश आहे. गेल्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने एका हिंदुस्थानी कंपनीने बनवलेल्या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोलचा वापर करण्यात आल्याचे सांगितले होते. हे कारच्या ब्रेक फ्लुइडवर लावले जातात. जागतिक संघटनेने सांगितले होते की, यामुळे कफ सिरप घातक ठरू शकल्याचा इशारा दिला होता.

एवढेच नाही तर फेब्रुवारीमध्ये तामिळनाडूची कंपनी ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने निर्यातीसाठी तयार केलेले आपले सर्व आय ड्रॉप्स परत मागवले होते. हिंदुस्थान जगभरात मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात करतो. तर खोकल्याचे सिरप आर्थिक वर्षात १७.६ अरब डॉलर निर्यात केले होते. याआधी २०२१-२०२२ मध्ये निर्यात १७ अरब डॉलर एवढे होते.





  Print






News - Rajy




Related Photos