महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाटच्या सहयोगाने २४ मे रोजी एक दिवसीय छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगणघाट येथे होणाऱ्या शिबिराचा लाभ हिंगणघाट, समुद्रपुर व सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील युवक व युवतींना होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता १० वी, १२ वी नंतर करीअरच्या संधी, विविध प्रवेश परीक्षा, १२ वी नंतर पदवी, पदविकेसाठी प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडेटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारीत शिक्षण व प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा इत्यादीबाबत शिबिरामध्ये तंज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हिंगणघाट येथे २४ मे रोजी सकाळी १०:०० वाजता बिडकर महाविद्यालयाच्या सभागृहात या युवाशक्ती करीअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात सर्वस्तरावरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरात विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे उत्तर तज्ञांकडून मिळणार आहे.

मार्गदर्शन शिबिरासाठी शासनातर्फे क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या क्यूआर कोडला मोबाईलद्वारे स्कॅन करुन आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीचा उपयोग शासनाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी होईल. ही नोंदणी पुर्णपणे मोफत असून आयटीआय, इयत्ता १०, १२ वी, पदवी, पदविका, नोकरीच्या शोधात असलेले तरुण या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे, असे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुजय राहाटे यांनी कळविले आहे.   





  Print






News - Wardha




Related Photos