महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : संतोष सिंह रावत गोळीबार प्रकरणी दोघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात पहिल्यांदाच राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत ह्यांचेवर मुल येथे ११ मे ला बँकेच्या कार्यालयातून बैठक आटोपून निघत असताना गोळीबार झाला होता. या घटनेत संतोष सिंह रावत जखमी झाले होते. या प्रकरणाचा लवकरात - लवकर छडा लाऊन घटनेमागिल सत्य समोर आणण्यासाठी राजकीय नेत्यांसह जनतेचा पोलिसांवर दबाव वाढत होता.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांनी देखील पोलिसांना गोळीबार प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपींना तत्काळ गजाआड करण्याचे निर्देश दिले होते. या साठी ९ पोलीस पथक तयार करत होते. बारकाईने सर्व बाबी चे तपास सुरू होते. राजकीय द्वेशेतून हल्ला झाला का?  याकळे ही बघितले गेले. सीडीसीबी चे माजी अध्यक्ष यांना ही विचारपूस करण्यात आले होते. तपास सुरू असताना चंद्रपूर येथील बाबुपेठ परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय नेत्यावर प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिलीच घटना असुन या संदर्भात पोलिसांना राजकीय नेत्यांसह इतर लोकांवर संशय होता  मात्र, प्रत्यक्षात आरोपी दुसरेच निघाल्याने या घटनेमागे राजकीय शक्ती आहे की बँकेतील नोकरी भरती आहे. याचा उलगडा पोलीस चौकशीत होईलच मात्र या घटनेचे खरे कारण सध्या गुलदस्त्यात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos