भंडारा जिल्हयात कलम ३७ (१)(३) लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
जिल्हयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली सुरु झालेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच विद्युत भारनियमन बंद करावे, शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते योग्य वेळी रास्त भावात मिळण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी लाभकारी योजना घोषित कराव्यात, दुष्काळग्रस्त भागात रोजगार उपलब्ध करुन द्यावे. शेतीसाठी आवश्यक बि-बियाणे शासनाने रास्त किंमतीत द्यावे, अशा विविध मुद्यांना हाताशी धरुन राजकीय पुढारी, मजूरवर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरुन धरणे, मोर्चे, आंदोलन व निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. २१ फेब्रुवारी २०१९ पासून १२ व्या वर्गाची व दहाव्या वर्गाची वार्षिक परीक्षा सुरु होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी जोमाने आपल्या अभ्यासाला लागलेला आहे. तेव्हा जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी.
स्थानिक कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.  जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, शांतता कायम टिकून राहावी म्हणून  १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जिल्हादंडाधिकारी शांतनू गोयल यांनी कलम ३७ (१) (३) लागू केले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-01


Related Photos