महत्वाच्या बातम्या

 स्व. राजीव गांधी हे माहिती व तंत्रज्ञान युगाचे जनक होते : सोहेल रजा शेख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस             

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी हे माहिती व तंत्रज्ञान युगाचे जनक होते.राजीवजीच्या काळात भारत देश यशाच्या शिखरावर पोहचले होते. असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख यांनी केले. आकाशवाणी चंद्रपूर समोरील कॉम्प्लेक्स मधील अल्पसंख्यांक विभाग च्या कार्यालयात  स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष    

सय्यद रमजान अली प्रामुख्याने उपस्थित होते   

सय्यद रमजान अली म्हणाले की,स्व. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर अतिशय कमी वयात देशाची धुरा सांभाळण्याची वेळ त्यांच्या खांद्यावर आली. अश्या  बिकट परिस्थितीतही राजीव गांधी यांनी दूरदृष्टी ठेऊन देशाला प्रगतशील राष्ट्राच्या यादीत बसविले. देशात माहिती व तंत्रज्ञान बरोबर हरित क्रांती सुद्धा घडवून आणली, त्याच बरोबर अठरा वर्षाचा युवकांना मतदानाचा अधिकार सुद्धा राजीवजी गांधी यांनी दिले. भारत देशात औद्योगिक क्रांती सुद्धा घडवून आणली आणि देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त करवून दिले, असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. 

विनम्र अभिवादन च्या या कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून समस्त उपस्थितां कडून आदरांजली वाहण्यात आली.  

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपुर शहर कांग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे अध्यक्ष ताजुद्दिन शेख यांनी केले. 

सदर कार्यक्रमात चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग शहर अध्यक्ष ॲड. रुबिना मिर्झा, अल्पसंख्यांक विभाग च्या नूरी खान, आतिफ रजा,शहबाज शेख सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos