लाखांदुर येथे शेतकरी संघटनेच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस


-निष्ठुर प्रशासनाला अद्यापही पाखर फुटेना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / लाखांदुर : 
येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. माञ अद्यापही लोकप्रतिनीधी व निष्ठुर प्रशासनाला जाग येत नाही. 
 मागील पाच दिवसापुर्वी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश व छत्तीसगढ प्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला अडीच हजार रूपये हमीभाव द्यावा अथवा ७५० रूपये बोनस जाहीर करावे. तसेच महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायतीमध्ये बंद असलेली रोजगार हमी योंजनेची कामे पुर्ववत करावी या मागण्यांसाठी दि.२८ जानेवारीला गांधी चौक लाखांदुर ते तहसील कार्यालयापर्यत १० हजार शेतकरी, शेतमजूरांच्या संख्येने महामोर्चा निघाला होता. मोर्चा आटपल्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी, शेतमजूर महिलावर्गाने नविन बस स्टाँप समोरील कृषी प्रदर्शनीच्या मैदानावर आमरण उपोषण चालू केले असून, आजमितीला या उपोषण आंदोलणाचा पाचवा दिवस आहे. 
 गेल्या आठवड्यात अवकाली पावसाने हजेरी लावल्याने सर्वञ कडाक्याची थंडी पडली आहे. अशाही स्थितीत जवळपास दोनसे महिला, पुरूष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. माञ अद्यापही प्रशासन व लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष वेधले नाही. दरम्यान २८ जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन शासन दरबारी पाठपुरवा करण्याचे आश्वासन दिले होते. माञ सत्ताधारी पक्षाच्या अजुन एकाही लोकप्रतिनीधींनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही. 
 दरम्यान प्रस्तुत प्रतिनीधींनी आज उपोषणकर्त्यांचे मत जाणून घेतले असता उपोषणकर्त्यांनी जोवर प्रशासनाचे लोकप्रतिनीधी येऊन आम्हच्या मागण्या पुर्ण करत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर शनिवारपर्यत (ता.२) मागण्या मंजूर न केल्यास लोकप्रतिनीधींच्या विरोधात धिक्कार मोर्चा व रास्ता रोको आंदोलणाचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
 

   Print


News - Bhandara | Posted : 2019-02-01


Related Photos