सुरजागड येथील जाळपोळ प्रकरणी माओवादी नेता प्रा.वरवरराव, सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात


- न्यायालयात केले हजर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२०१६ साली सुरजागड येथील उत्खननावरील ८० वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी व सध्या भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले माओवादी चळवळीचे कट्टर समर्थ प्रा. वरवरराव आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  दोघांवरही गुन्हे दाखल असून आज ३१ जानेवारी रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
माओवादी नेत्यांचे मार्गदर्शक अशी ओळख असलेले प्रा. वरवरराव यांच्यासह नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग मागील वर्षीपासून भीमा कोरेगाव येथील प्रकरणात पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सुरजागडमध्ये नक्षल्यांनी ८० हून अधिक वाहने जाळपोळ केली होती. या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी पुणे पोलिसांकडून दोघांचाही ताबा घेतला आहे. न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या निर्णयाबद्दल अद्याप कळू शकले नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-31


Related Photos