ऑटोच्या अपघातातील चालकाचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कठाणी नदीच्या जुन्या पुलावरून ऑटो नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर ७ जण गंभीर जखमी आहेत.
डंबाजी कुरूडकार  रा. काटली असे मृतक चालकाचे नाव असल्याचे कळते. या अपघातात प्रवासी इंदिरा टेंभुर्णे (४०) रा. साखरा, गोविंदा बुधा मेश्राम (६५) रा. साखरा, भास्कर पांडूरंग डोईजड (४५) रा. साखरा, प्रेमिला गायकवाड (४०) रा. साखरा, निशा उंदिरवाडे (४०) रा. साखरा, यमुबाई डोंगरवार रा. साखरा,  हे जखमी झाले आहेत. जखमींवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
एमएच ३४ डी ५९१६ क्रमांकाचा ऑटो प्रवासी घेवून आरमोरी मार्गाने गडचिरोलीकडे येत होता. दरम्यान कठाणी नदीच्या पुलावर आल्यानंतर चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. यामुळे ऑटो  थेट कठाणी नदीत कोसळला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-31


Related Photos