पोटेगाव परिसरातील जमगाव येथे नक्षल्यांनी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर पेटविले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षल्यांनी पुकारलेल्या बंददरम्यान नक्षल्यांनी हिंसक कारवाया सुरू केल्या असून नागरीकांच्या हत्या तसेच जाळपोळ केली जात आहे. आज ३१ जानेवारी रोजी नक्षल्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. दरम्यान रात्री गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील जमगाव येथे रस्ता कामावरील २ जेसीबी आणि चार ट्रॅक्टर जाळून टाकले. तसेच कोरची तालुक्यात एक ट्रक पेटवून रस्ता अडविला.
मागील आठवडाभरात भामरागड तालुक्यातील नक्षल्यांनी पाच नागरीकांची हत्या केली आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे तोडून बॅनर बांधून रस्ते अडविले. यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून नक्षल्यांनी जाळपोळ सुरू केली आहे. कालपासून नक्षल्यांनी एकूण सात वाहने पेटवून दिली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-31


Related Photos