महत्वाच्या बातम्या

 महाराजस्व अभियानामुळे एकाच मंचावर विविध योजनांचा लाभ : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- तुमनूर माल येथे महाराजस्व अभियान संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्य शासनाने महाराजस्व अभियान शिबिर घेण्याचे ठरविले आहे. या शिबिरात विविध विभाग एकत्र येऊन नागरिकांना लोक कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचा काम हाती घेतला आहे. असे कुठल्याही इतर विभागाच्या शिबिरात बघायला मिळत नाही. त्यामुळे महाराजस्व अभियान म्हणजे एकाच मंचावर मिळणारा विविध योजनांचा लाभ होय.असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.


सिरोंचा तालुक्यातील तुमनूर माल येथे आयोजित शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अनिल पटले, तुमनूर मालचे सरपंच पद्मा सिडाम, उपसरपंच सारक्का पेद्दी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी अरवेली,विक्रम मारशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना महसूल प्रशासनाकडून विविध ठिकाणी आयोजित महाराजस्व अभियान शिबिरात विविध विभागांना प्राचारण करून त्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. एवढेच नव्हे तर त्या त्या विभागात नागरिकांच्या प्रलंबित समस्येबाबत आढावा घेऊन विविध दाखले, प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी स्वतः महसूल विभाग पुढाकार घेतल्याने आज खेड्यापाड्यातील नागरिकांचे अनेक प्रलंबित समस्या सोडविण्यात आले आहे. 


या शिबिराचा गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांना नक्कीच लाभ झाला आहे. यापुढेही अशाचप्रकारे अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वच विभाग पुढाकार घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी येत असून नागरिकांनीही अशा शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


तुमनूर येथील शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. विविध विभागाकडून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्र आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी तलाठी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos