महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थी बनणार यूजीसीचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (एनईपी) उच्च शिक्षणातील तरतुदींचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देशातील 300 विद्यार्थ्यांची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवड करणार आहे.
यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीशकुमार यांनी सांगितले, यूजीसी एनईपीच्या तरतुदी लागू करण्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देत आहे. यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था, प्राचार्य आणि संचालकांना प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची नावे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. एनईपी-सारथी म्हणून नेमणूक झालेले विद्यार्थी समाजात उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध बदलांच्या माहितीचा प्रसार आणि प्रचार अन्य विद्यार्थी आणि पालकांमध्ये करतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे फायदे लोकांना ते पटवून देतील.


उच्च शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याची नियुक्ती एनईपी-सारथी म्हणून करण्यात येईल. त्यासाठी या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व असामान्य असावे. शिक्षण संस्था, विद्यापीठे जूनअखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठवू शकतील. जुलैमध्ये 300 एनईपी-सारथीच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.





  Print






News -




Related Photos