न्याय मागण्यासाठी नागेपली येथील नागरिकांचे अपर जिल्हाधिक्कारी कार्यालयासमोर आमरण उपोषण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी
:   नागेपल्ली येथील सर्व्हे क्रमांक ८४ मधील रहिवाश्यांचे  वास्तव्यास असलेले घर उध्वस्त केल्यामुळे न्याय मागण्यांसाठी ४० महिला मुलं बाळांसह  अहेरी येथील अप्परजिल्हाधिकारी कार्यालया समोर  आज पासून आमरण उपोषणाला बसले  आहेत.
अहेरी तालुक्यातील   आलापल्ली साजा क्र. ५ अंतर्गत येत असलेल्या नागेपल्ली येथील सर्व्हे न.८४ मधील क्षेत्र १.२१ आर  ह्या शासकीय जमिनीवर  ७० - ८० परिवार घरे बांधून राहत असतांना  सदर जागेवर आलापल्ली येथील एका  धनाढ्य तथा कथित सामाजिक कार्यकर्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या व्यक्तीची नजर असल्याने त्याने अधिकारी व राजकीय लोकांशी संगनमत करून  त्रास  देणे सुरू केले आहे.
२६ डिसेंबर रोजी तहसीलदार यांनी पोलीस फौज फाट्यासह सोबत  अतिक्रमण धारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांना धाक दडपशाही  करून घरे पाडू लागले.  त्याचा आम्ही प्रतिकार केला . त्यामुळे त्याच दिवशी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.  त्यापैकी काही लोकांना अटक सुद्धा करण्यात आली.  त्याचप्रमाणे २३ जानेवारी रोजी रात्रौ ११:४५  च्या दरम्यान  तहसिलदार यांनी काही लोकांना सोबत घेत झोपेत असललेल्याना  उठवत काही घरांना आग लावली.  याबाबत ची तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप महिलांनी निवेदनात केला आहे. 
आम्ही सदर ठिकाणी शांततापूर्वक निवास करीत असताना २८ जानेवारी रोजी उपविभागीय अधिक्कारी अहेरी यांनी कलम १४४ लावून आमचे घरे जबरदस्तीने तोडले आणि या ठिकाणी कोणी पाऊल ठेवले तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.  त्यामुळे अश्या परिस्थितीत आमचे जीवन जगणे कठीण झाले आहे. आमच्यावर झालेल्या अन्याया संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसत आहोत या प्रकरणाची योग्य चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-30


Related Photos