महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : अपघातात पोलिसाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस                                     

प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल तालुक्यात १९ मे शुक्रवार हा ब्लॅक शुक्रवार ठरला आहे. काल तालुक्यात दोन दुर्घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाले आहे. वीज खांब घेऊन जाणारे पिपरी दीक्षित - भंजाळी मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन दोन मजूर दबून मृत्यू झाले तर दुसऱ्या घटनेत चिरीली जवळ पोलीस कर्मचारी चा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. 

पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथील पोलिस शिपाई डाक घेऊन मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आले. डाक देऊन दुचाकीने परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाले. यात त्यांचे मृत्यू झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० घडली.

विशाल गणपत खडके वय ४२ रा. चंद्रपूर असे मृतक पोलिस शिपायाचे नाव आहे. ते पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर होता. विशाल खडके हे पोंभूर्णा पोलिस ठाण्याची डाक मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात देऊन दुचाकीने पोंभूर्णाला परत येत असताना चिरोली गावानजीकच्या पुलासमोरील वळणावर ते दुचाकीसह पडले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांच्या मृत्यू झाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos