महत्वाच्या बातम्या

 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे सत्कार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी आज गडचिरोली दौऱ्यावार जात असतांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अतुल गण्यारपावर यांची बाजार समितीमध्ये भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीचे विचारपूस केली. 


या भेटी दरम्यान चामोर्शी बाजार समितीमध्ये सभापती पदी निवडून आल्याबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी अतुल गण्यारपावर व उपसभापती प्रेमानंद मलिक यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले.
यावेळी सत्कार करतांना संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos