महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील शेतकऱ्यांकडून धान खरेदीकरीता महाराष्ट्र शासनाने खरेदीचा कालावधी 01 मे 2023 ते 30 मे 2023 निश्चित केलेला आहे. मागील हंगामापेक्षा शेतकरी नोंदणी कमी झालेली असल्याने शेतकरी ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहु नयेत याकरीता 31 मे 2023 पर्यंत NeML पोर्टलवर नोंदणी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
तरी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांनी 31 मे 2023 सायंकाळ 5.00 वाजेपर्यंत ई-पिक पेरा नोंदणी तसेच गाव नमुना 7/12 चालु हंगामाचा पिक पेरा असलेला ऑन-लाईन उताऱ्याची मुळ प्रतिसह गाव जोडलेल्या केंद्रावर नोंदणी करणेस आपणास आवाहन करण्यात येत आहे.


हंगाम 2022-23 (रब्बी) मधील भरडधान्य खरेदीचा व शेतकरी नोंदणीचा कालावधी 04 मे 2023 ते 20 मे 2023 असा निश्चित केलेला आहे. प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत मंजुर भरडधान्य मका खरेदी केंद्र पुढीलप्रमाणे आहे. तालुका- कुरखेडा, उप प्रा.का.चे नाव- कुरखेडा, मंजुर मका खरेदी केंद्र TDC कुरखेडा., तालुका-धानोरा, उप प्रा.का.चे नाव- धानोरा, मंजुर मका खरेदी केंद्र TDC धानोरा., तालुका-चामोर्शी, उप प्रा.का.चे नाव – घोट, मंजुर मका खरेदी केंद्र TDC मार्कंडा.


तरी नोंदणीपासून वचित शेतकऱ्यांनी 20 मे 2023 सायंकाळ 5.00 वाजेपर्यंत ई-पिक पेरा नोंदणी तसेच गाव नमुना 7/12 चालु हंगामाचा पिक पेरा असलेला ऑन-लाईन उताऱ्याची मुळ प्रतिसह उपरोक्त नजिकच्या भरडधान्य केंद्रावर नोंदणी करणेस आपणास आवाहन करण्यात येत आहे. असे  प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos