लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखांचा सोशल मीडियावरील संदेश चुकीचा : निवडणूक आयोग


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने बाकी आहेत. निवडणुकांच्या तारखांची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर एक  मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची यादी देण्यात आली आहे. ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल माध्यमांवर वेगाने शेअर होत आहे. परंतु हा मेसेज चुकीचा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील मतदान ७ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान १२ एप्रिलला होईल असे म्हटले आहे. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याने स्पष्ट झाले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने एक पत्रक काढत व्हायरल होणारे मेसेज चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
समाजमाध्यमांवर विशेषतः व्हॉट्सअपवर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे प्रसारित वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत लोकसभा निवडणुकांबाबतचा कार्यक्रम घोषित केलेला नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे.   Print


News - World | Posted : 2019-01-30


Related Photos