महत्वाच्या बातम्या

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत आक्षेप व हरकती नोंदवावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाद्वारे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळ असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्काराच्या अनुषंगाने काही हरकत व आक्षेप असल्यास त्या नोंदवाव्यात, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे.  

शासन निर्णयान्वये संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरीता - Awards) राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कार्थीची यादी १६ ते २२ मे २०२३ या कालावधीत प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार याबाबत आक्षेप असल्यास संचालनालयाच्या desk१४ days-mh@gov.in या ई-मेल वर २२ मेपर्यंत आक्षेप व हरकती सादर करावयाच्या आहेत.

विहीत नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घ्यावा. पुरस्काराच्या अनुषंगाने हरकत व आक्षेप नोंदवाव्यात, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.  विहीत कालावधीत प्राप्त होणाऱ्या हरकत व आक्षेप यांचा विचार करण्यात येईल.





  Print






News - Nagpur




Related Photos