आपले सरकार केंद्र स्थापन करण्यासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायती/शहरी भागामध्ये आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय १९ जानेवारी
२०१८ च्या परिच्छेद क्र.१(अ) मधील निकषानुसार ग्रामपंचायत/शहरी भागात 25 आपले सरकार केंद्र स्थापन करावयाचे आहे.
गोंदिया जिल्ह्यातील रिक्त असलेल्या २५ ग्रामपंचायत/शहरी भागाची यादी व अर्जाचा नमूना जिल्ह्याच्या वेबसाईवर www.gondia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. तसेच रिक्त २५ ग्रामपंचायत/शहरी भागाची यादी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया व जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, संबंधित तलाठी कार्यालय व संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली असून अर्जदारांनी २८ जानेवारीपासून ते १२ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथील MSWAN कक्ष शाखेत विहित नमून्यात अर्ज सादर करावे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-01-29


Related Photos