महत्वाच्या बातम्या

 शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर शिबिरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सरकारी योजनांचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी  शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी  हा उपक्रम राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७५ हजार पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळून देण्यात येणार आहे. यासाठी तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातील संबंधित नोडल अधिकारी तथा तहसिलदार यांनी सर्व विभाग यंत्रणांशी समन्वय साधुन शिबिराचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहे.

सेलू, कारंजा व हिंगणघाट येथे २३ मे रोजी शिबिर घेतले जाणार आहे. देवळी, आर्वी व समुद्रूपर येथे २४ मे रोजी शिबिर होईल. वर्धा येथे २५ मे व आष्टी येथे २६ मे रोजी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos