आजपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम, १७०० आदिवासी खेळाडू गडचिरोलीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाला आज 29 जानेवारीपासून सुरूवात होत असून राज्यभरातील १ हजार ७०० आदिवासी खेळाडू गडचिरोलीत दाखल झाले आहेत. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या संमेलनात आदिवासी खेळाडू आपल्यातील क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखविणार असून चित्तथरारक व चुरशीच्या सामन्याचा तीन दिवस आनंद लुटता येणार आहे.
 क्रीडा संमेलनाचे उद्घाटन उद्या २९ जानेवारी रोजी गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या शुभ हस्ते होत आहे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हयाचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास व वने राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम उपस्थित राहणार आहेत. 
क्रीडा संमेलनाचे उद्घाटन २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता  होईल.  यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते,  विधानपरिषद सदस्य- आमदार रामदास आंबटकर, नागो गाणार, अनिल सोले, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, नगराध्यक्ष यागिता  पिपरे तर विशेष अतिथी म्हणून आदिवासी विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह  यांची उपस्थित रहाणार आहे. याप्रसंगी विशेष  आमंत्रित म्हणून एशियन गेम चॅम्पीयन, अर्जुन पुरस्कार प्राप्त, ऑलम्पिक धावपटू ललीता बाबर हया असतील.
 आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या हस्ते गुरुवार दिनांक ३१ जानेवारी  रोजी  सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे राहणार आहेत.  याप्रसंगी आदिवासी कल्याण विभागाचे सचिव दिपक खांडेकर ( भारत सरकार), आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित राहणार आहेत. 
आदिवासी विकास विभाग आयुक्त डाॅ. किरण कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली व आदिवासी विकास नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संमेलनाची जय्यत तयारी झाली असून क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सबंधित अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-29


Related Photos